पिंपरी (Pclive7.com):- सचिन साठेंनी माझ्या विरोधात केलेली तक्रार खोटी आहे. मी कोणतीही शैक्षणिक खोटी माहिती निवडणुक प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. माझे शिक्षण झाले आहे ती कागदपत्रे निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेली आहेत. सलग ३ वेळा सचिन साठे यांना मतदारांनी नकारले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा सहा हजाराहून अधिक फरकाने त्यांचा पराभव झाला. त्या नैराश्यातूनच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याची प्रतिक्रीया भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी pclive7 शी बोलताना दिली.
काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरोधात सांगवी पोलीसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे. महापालिका निवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती कामठे यांनी प्रतिज्ञापत्रात सादर करून निवडणुक आयोगाची फसवणूक केली असल्याची तक्रार साठे यांनी केली आहे.
या तक्रारीबाबत बोलताना तुषार कामठे म्हणाले की, साठे यांनी माझ्यावर केलेले आरोप निव्वळ खोटे आहेत. महापालिका निवडणुकीत सचिन साठे यांचा माझ्याकडून मोठ्या फरकाने पराभव झाला. तो धक्का त्यांना सहन झाला नसावा, सगल तीन वेळा मतदारांनी त्यांना नाकारल्याने नैराश्य आले आहे. त्या नैराश्यातूनच साठे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन साठेंच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहर ‘काँग्रेस मुक्त’ झाले. त्यामुळेच ते आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. साठे यांना काय तक्रार करायची आहे ती त्यांनी करावी मी त्यासाठी कायदेशीर लढा द्यायला तयार आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून न्यायालयीन लढाईक जो निर्णय होईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रीया तुषार कामठे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group