पिंपरी (Pclive7.com):- सीएसआयटी जुनियर कॉलेज पूर्णानगरमध्ये आंतर महाविद्यालयीन विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अपर्णा मोरे यांनी केले. त्यात त्यांनी कॉलेज बद्दल व विज्ञान प्रदर्शनाबद्दल माहिती सांगितली.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. सुलभा विधाते सेवानिवृत्त प्राचार्या एम.इ.एस. राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा, पुणे ,माननीय श्रीनिवास सारंगपाणी, औद्योगिक समुपदेशक, डॉ. श्रीकांत जगताप, प्राचार्य सीएसआयटी वरिष्ठ महाविद्यालय, कविता उपलंचीवार, प्राचार्या गीतामाता जुनियर कॉलेज चिंचवड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. सारंगपाणी सरांनी बक्षीस मिळवणे हे ध्येय नसून चिकित्सक दृष्टिकोन कसा विकसित करावा याबद्दल मार्गदर्शन केले. विधाते मॅडम यांनी आपल्या उणीवांबद्दल वाईट वाटून न घेता त्यांनाच आपली ताकद बनवून आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचावे याचे मार्गदर्शन केले.
डॉ. जगताप सरांनी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती कशी जोपासायला हवी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रदर्शनास तीनही कनिष्ठ महाविद्यालयातून पन्नास गट सहभागी झाले होते. या प्रदर्शनाला इतर शाळांच्या मुख्याध्यापकांसह त्यांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
आलेल्या मान्यवरांनी सर्व कर्मचारी सदस्यांचे त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि तीनही महाविद्यालयांमधील अतूट समन्वयाबद्दल कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका युगंधरा चौधरी यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका द्रोपती जगताप यांनी केली.






















Join Our Whatsapp Group