पिंपरी (Pclive7.com):- सांगवी पोलिस हाय.. सगळे भ्रष्टाचारी आहेत. असे म्हणत केलेल्या कारवाईचा विरोध एका वाहनचालकाने केला. सांगवीतील साई चौकात एका चारचाकी चालकाने ठिय्या आंदोलन केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साई चौकात शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी एका वाहनचालकावर पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून रस्त्यावरच गाडी थांबवून आंदोलन केले. पोलिस प्रशासनाचा धिक्कार करत त्याने सांगवी पोलिस हाय..हाय, सांगवी पोलिस भ्रष्टाचारी अशाही घोषणा दिल्या.
आंदोलन करणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी उचलून नेल्याचेही त्या व्हिडीओत दिसते. पोलिस त्यांच्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्यांशी कशी भाषा बोलतात हे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत असल्याने सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Tags: Sangavi Police























Join Our Whatsapp Group