पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता राहुल कलाटे हे आज (दि.७) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहिर झालेला नाही. उमेदवारीसाठी राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्या नावाची चर्चा आहे. अशा परिस्थितीत कलाटे हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाची बैठक काल रात्री उशीरा पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. व त्यावेळी मीही तेथे उपस्थित राहणार आहे असे सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप वतीने अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करीत आज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी महाविकास आघाडी वतीने राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.