पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचार प्रमुखपदी महाविकास आघडीच्यावतीने जेष्ठनेते भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध संघटना तसेच घटक पक्षाचा नाना काटे यांना पाठिंबा मिळत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. भोईर यांचा अनुभव आणि संपर्क लक्षात घेऊन नाना काटे यांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.




















Join Our Whatsapp Group