दिल्ली (Pclive7.com):- गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्याने अडचणीत आलेले व लोकांचा रोष ओढवून घेतलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनातून आज देशातील १३ राज्यातील राज्यपालांचे नव्याने नियुक्ती केली आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहेत.
रमेश बैस हे यापूर्वी झारखंडमध्ये राज्यपाल होते. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते रायपूर येथून खासदार म्हणून संसदेवर निवडून गेले होते.






















Join Our Whatsapp Group