पिंपरी (Pclive7.com):- सुप्रभात हास्य क्लब दुर्गा देवी टेकडी पिंपरी चिंचवड येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आज सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली. या कार्यक्रमासाठी व्याख्याते राजेंद्र घावटे, श्री बाबर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर होते.

छत्रपती शिवराय व आजचे सामाजिक, राजकीय विषयावर मारुती भापकर यांनी आपले सडेतोड मत मांडले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राजेंद्र गावडे यांनी सविस्तर मांडणी केली. यावेळी दुर्गादेवी टेकडी परिसर छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने दणाणून सोडला. मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group