पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचा आमदार कोण होणार? याचा फैसला आज होणार आहे. थेरगाव येथील कामगार भवन येथे काही वेळातच ही मतमोजणी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतमोजणी सुरू होणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला होता. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५०.४७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळाली होती.
मतमोजणीच्या ३७ फेऱ्या..
मतमोजणी उद्या गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.