पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 चा पहिला बळी गेला आहे. ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वृद्ध व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आज सकाळी मृत्यू झाल्याच समोर आलंय.

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या शून्य रुग्ण आहे अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.





















Join Our Whatsapp Group