पिंपरी (Pclive7.com):- आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे देशभरातील लोककलावंत केंद्र सरकारच्या पुरस्कार व सुविधांपासून अद्यापही दुर्लक्षितच राहिले असल्याची खंत केरळमधील लोककलाकार प्रा. कलामंडलम गीतानंदन यांनी व्यक्त केली. सीएमएसच्या वतीने केरळदिना निमित्ताने गीतानंदन यांना पंचसहस्रवेदी हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योजक पी.सी नंबीयार, सीएमएसचे अध्यक्ष पीव्ही भास्करन, सरचिटणीस टि.पी विजयन, केव्ही जनार्दनन, उपाध्यक्ष के रघुनाथ, पी श्रीनिवासन,सहसचिव ज्योती दिनराज, व्ही.के रामकृष्णन, जी करुणाकरन, प्रमिला पितांबरन, विनीत विजयन आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, मी वयाच्या ७ व्या वर्षापासून ओट्टनटूल्लल सादर करीत आहेत. देशविदेशात ५ हजाराहून अधिक कार्यक्रम केले. ओट्टनटुल्लल ही गाणे, संवादफेक, अभिनय, नृत्य यांचा संगम असलेली पारंपरिक मल्याळी लोककला आहेत. ओट्टनटुल्लन ही एकपात्री सादर केली जाणारी सामाजिक व्यंगावर भाष्य करणारी लोककला आहे. या कलेला लोकाश्रय मिळाला मात्र राजाश्रय अद्याप मिळालेला नाही. विदेशी रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र माझ्यासारखे देशातील अनेक लोककलावंत पद्मश्री अशा पुरस्कारापासून वंचित राहिले आहे. कलेला भाषा, प्रांत, जात असे बंधन नसते. कला महोत्सवात आमच्या कलाकारांमध्ये भेदभाव केले जाते, वेगळी वागणूक दिली जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजेत समान दर्जा मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group