पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक दंतवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘RevaDent’ मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रसिद्ध रूट कॅनाल तज्ज्ञ डॉ. जय भोपटकर (BDS, MDS Endodontics) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या क्लिनिकमुळे परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या दंतसेवा एकाच छताखाली मिळणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, उद्योजक संदीप काटे, युवा नेते उमेश काटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी डॉ. जय भोपटकर आणि भोपटकर परिवाराचे अभिनंदन करत नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “पिंपळे सौदागर हा आरोग्याबाबत जागरूक नागरिकांचा परिसर आहे. डॉ. जय भोपटकर यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरू केलेल्या या मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दंत उपचारांसाठी दूर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ‘प्रिसिजन, केअर अँड एक्सलन्स’ या ध्येयवाक्यासह सुरू झालेली ही सेवा परिसरासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.”

क्लिनिकचे संचालक डॉ. जय भोपटकर यांनी उपस्थितांना क्लिनिकमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल डेंटल एक्स-रे, प्रगत रूट कॅनाल उपचार पद्धती तसेच विविध दंतसेवांबाबत माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांना दर्जेदार आणि अचूक उपचार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास भोपटकर परिवारातील सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळे सौदागर परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये ‘रेवाडेंट’ क्लिनिकची भर पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





















Join Our Whatsapp Group