पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस देखील काटे यांनी केली आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून संरक्षणसाठी टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला. किवळे येथे झालेल्या या अपघातमध्ये ५ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस नेते नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी भेट देऊन त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली तसेच जखमी असलेल्या रूग्णांची देखील त्यांनी माहिती घेतली.





















Join Our Whatsapp Group