एस. बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी (Pclive7.com):- वास्तुविशारदांनी नवीन आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे. विविध वास्तूंचा अभ्यास तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे, असे प्रतिपादन वास्तुविशारद पुष्कर कानविंद यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिजाईन मध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची (Architectural Design Project- Progressive Jury) परीक्षेची पूर्वतयारी आणि तज्ज्ञ वास्तुविशारद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वास्तुनिर्मिती क्षेत्रातील नावाजलेले वास्तुविशारद व शिक्षण क्षेत्रातील नामवंत प्राध्यापकांना आमंत्रित केले होते. वास्तुविशारद पुष्कर कानविंद, शिरीष केंभवी, संजय तासगावकर, शशांक फडके, विनोद धुसिया, कपिल जैन, प्रतिक देशमुख, शार्वेय धोंगडे तसेच प्रा. अरूण अत्रे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. महेन्द्र सोनावणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे यांनी तर आभार प्रा. अरुण अत्रे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.