पिंपरी (Pclive7.com):- नोव्हेंबर २०२२ मध्ये रौप्य महोत्सव महोत्सव साजरा करणारी पिंपरी चिंचवड शहरातील तपोधन नागरी सहकारी पतसंस्था एक अग्रेसर पतसंस्था आहे. एकूण १३०० सभासद असणाऱ्या या पतसंस्थेच्या २०२३-२८ कालावधीसाठी चेअरमन पदी बाळासाहेब लांडे व व्हाईस चेअरमन पदी ज्ञानदेव (माऊली) थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी अधिकारी संतोष शिंगाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये चेअरमन पदी बाळासाहेब लांडे व व्हाईस चेअरमन पदी ज्ञानदेव (माऊली) थोरात तसेच व्यवस्थापक पाजक्ता आंगणे, संचालक पदी बाबासाहेब लांडगे, विकास विधाते, शिवजी पटेल, बाळासाहेब महादू जवळकर, संतोष तळेकर, पदमा कासकर, अलका दौंडकर यांची आणि तज्ञ संचालक पदी सुनिल लांडगे व रमाकांत स्वामी यांचीही निवड करण्यात आली.
या संस्थेचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड असुन संस्थेमध्ये बचत ठेव, दैनदिन ठेव मुदत ठेव, आर्वत ठेव या खात्यांची सुविधा उपलब्ध आहे. जामिनकी कर्ज, तारण कर्ज, व्यवसायासाठी कर्ज, टु व्हिलर व थ्रि -व्हिलर कर्ज सुविधे सह छोटे व्यवसायिक व लघु उद्योजकांसाठी ८ तासात तात्काळ कर्ज योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. मागील आर्थिक वर्षाची उलाढाल ४.५ कोटी रुपये तर कर्ज मर्यादा १.५ लाख रुपये आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत फक्त कोरोनाचा दोन वर्षांचा कालावधी सोडल्यास प्रत्येक वर्षी लांभाश वाटप करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने ज्येष्ठ सभासद व नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो अशी माहिती तपोधन नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात यांनी प्रसिद्धीस दिली आहे.