पिंपरी (Pclive7.com):- छावा संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी अमोल वीर यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक धनंजय जाधव यांनी ही नियुक्ती केली आहे.
यावेळी विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी प्रज्वल राजगुरू तसेच जिल्हा युवक उपाध्यक्षपदी संकेत सावंत यांचीही निवड करण्यात आली. यावेळी तुषार कार्याध्यक्ष गणेश सोनवणे, तुषार परांडे, संकेत सोनवणी, कृष्णा मोरे, शेखर देवरे, मच्छिंद्र चिंचोळे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. गुटख्यामुळे तरूणांमध्ये कँन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आगामी काळात छावा संघटना गुटखा बंदी विरोधात प्रामुख्याने काम करणार असल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.