त्यांच्याकडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४,००० रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड, ६,३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, ४,५०० रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३,३२,५०० रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२०० रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६,५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.