शिवणे मावळ (Pclive7.com):- पवन मावळातील डोणे येथील वारकरी सांप्रदायातील एक ज्येष्ठ व आध्यात्मिक क्षेत्रांशी जोडलेली नाळ व गावातील तरुणांच्या पाठीमागे नेहमीच आधारवडासारखे उभे राहणारे अशी ओळख असणारे नामदेव घारे यांची आढले बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी नाथा सावळे यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी सचिव तुकाराम लोहर व आदी मान्यवर उपस्थित होते.

१९९३ ते २००३ मध्ये सलग १० वर्षे काॕस्प प्लॕन सामाजिक संस्थेचे माध्यमातून डोणे गावात विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली. यामध्ये प्रामुख्याने पाणी याविषयावर मार्ग काढत संपुर्ण गावठाण आणि वाडीवस्तीवर संस्थेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठ्यपुस्तके तसेच शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल मिळवून देण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केले. तसेच शेतकऱ्यांना बैलगाडी ते शेतीअवजारे पर्यत संस्थेच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

यावेळी उपस्थितीत डोणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोकमहाराज कारके, मावळ तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय कारके, सरचिटणीस- चंद्रकांतभाऊ चांदेकर, पोलीस मिञ संघटना सचिव संदिप लांडगे, हभप अनिलमहाराज घारे, उपसरपंच पोपट वाडेकर, राष्ट्रवादी डोणे अध्यक्ष राहुल घारे, शेखर काळभोर, समिर खिलारी, एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कारके, पोलीस पाटील उमेश घारे, सरपंच लहु सावळे, शरद घोटकुले, शहाजी घोटकुले, गणेश राजिवडे, गोरख साठे, दशरथ साठे, संजय खिलारी, विश्वनाथ घोटकुले, एकता प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष विशाल कारके, सत्यवान घारे, सागर चांदेकर व आढले बु.,डोणे, दिवड, राजेवाडी व ओव्हळे गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags: आढले बुद्रुकचेअरमननामदेव घारेनामदेव घारे यांची आढले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवडबिनविरोध निवडविविध कार्यकारी सेवा सोसायटीशिवणे मावळ






















Join Our Whatsapp Group