पिंपरी (Pclive7.com):- जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर घडली. आवारे यांचा भरदुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार व तलवारीने वार करून खून झाला.

याप्रकरणी पोलिसांनी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे यांना अटक केली आहे. यातील संदीप मोरे याला पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. तर, उर्वरित तिघांना पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोन आणि खंडणी विरोधी पथाकने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी किशोर आवारे यांचा खून नेमका कशासाठी केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

यादरम्यान राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group