पिंपरी (Pclive7.com):- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे ‘आयटी व ओरॅकल फायनान्शियल मधील करिअर संधी’ या विषयावर स्टेरिस कॉर्पोरेशनचे सल्लागार जयकुमार पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना डेटा सायन्स, आयटी व ओरॅकल फायनान्शियलच्या मूलभूत बाबींविषयी सविस्तर माहिती सांगितली. सध्या या क्षेत्राला प्रचंड मागणी वाढली असून डेटा ऍनालिसिस व बिझनेस ऍनालिसिस या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअर संधी निर्माण होत आहे असेही पाटील यांनी सांगितले. डेटा एनॅलिटीक्समधील पॉवर बीआय, एसक्यूएल, पायथन, आर- लँग्वेज या साधनांबद्दलही त्यांनी आपल्या व्याख्यानातून सविस्तर विवेचन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रा.वैभव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत वाडकर यांनी केले. या व्याख्यान सत्राला एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group