भोसरी (Pclive7.com):- डुंबरवाडी येथील युवा उद्योजक निलेश दत्तात्रय आरोटे यांच्या मुलाचा वाढदिवस दि. ३१ मे २०२३ रोजी साजरा करत असताना हृदयरोग तज्ञ शिवनेर भूषण डॉ. सदानंद राऊत यांचे सर्पदंश या विषयावरील मार्गदर्शन शिबीर तसेच पारंपारिक लेझिम पथकाचा कार्यक्रम व ४०० आंब्याचे रोपे वाटुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजापुढे चांगला आदर्श ठेवत आरोटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मुलाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याचा निमित्ताने सामाजिक, राजकीय, वारकरी संप्रदाय, बैलगाडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन सर्पदंश तज्ञ शिवनेर भूषण पुरस्कार विजेते डॉ. श्री. सदानंद राऊत उपस्थित होते. तसेच माजी आमदार श्री. शरददादा सोनवणे, आंबेगाव कृषी उत्पन्न समितीचे संचालक श्री. देवदत्त निकम, जुन्नर पंचायत समितीचे मा. सभापती श्री. विशालभाऊ तांबे, मा. जि.प. सदस्य श्री. अनिलशेठ तांबे, श्री. मोहित ढमाले, ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज डुंबरे, ओतुर गावचे सरपंच श्री. प्रशांत डुंबरे, श्री. रघुनाथशेठ तांबे, श्री. प्रेमानंद अस्वार,
पिंपरी पेंढार गावचे उपसरपंच श्री. अमोल वंडेकर, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. नारायण डुंबरे साहेब, अॅडव्होकेट श्री. संजयजी शेटे, माजी सरपंच श्री. तान्हाजी डुंबरे, पीडीसी बँकेचे अधिकारी श्री. डी. एन. पवार साहेब, आंबेगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री. दिलीप पवळे, श्री. सुनिल शिंदे (सरपंच नागपुर), श्री. नवनाथशेठ पोखरकर, श्री. प्रकाशशेठ डुंबरे, श्री. शांताराम गो. डुंबरे,
श्री. गणपत मा. डुंबरे, श्री. विठ्ठल डुंबरे सर, श्री. अतुलशेठ गोरे, श्री. किरण भोर (पो. पाटील), श्री. देवीदास डुंबरे, प्रवीण डुंबरे, विकास डुंबरे, सोनल डुंबरे, प्रफुल्ल डुंबरे, गणेश तांबे, नितीन गोपाळे, राजेश हाडवळे, दिपक हुलावळे, सोमनाथशेठ डुंबरे तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शांताराम गोपाळ डुंबरे यांनी केले व बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालक व इतर मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनिल हांडे यांनी दिली.