मावळ (Pclive7.com):- गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपसचिव संतोष पाटील यांना प्रत्यक्ष भेटून मावळ तालुक्यातील कान्हे एमआयडीसी मधील छोटे लघु उद्योग यांना गुंडगिरी करणाऱ्या गुंडांपासून व समाजकंटकापासून पोलिस संरक्षण देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी केली आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात खुन व दहशत पसरविण्याचे प्रमाण खुप प्रमाणात वाढलेले आहे. कामाच्या नावाखाली खंडणी मागणे या कारणांमुळे छोटे लघु उद्योजक भितीच्या व दहशतीच्या वातावरणात आपले उद्योग करीत आहेत. त्यांना तात्काळ बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group