पिंपरी (Pclive7.com):- घराबाहेर खिडकीला दोरीने बांधलेला झोका खेळताना गळफास लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज भागातील आंबेगाव (बु.) परिसरात घडली आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे मृत्यूमुखी पडलेली सात वर्षीय चिमुकली आई-वडिलांना एकुलती एक होती.

आदिती दत्तात्रय कुलकर्णी (वय ७, रा. मल्हारीनगर, आंबेगाव, कात्रज, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिती पहिलीत शिकत होती. घराच्या बाहेर असलेल्या खिडकील टॉवेल आणि दोरीने झोका बांधला होता. तिची आजी घरात होती. आई आणि वडील दोघेही कामावर गेले होते.
आजी घरात असताना आदिती घराच्या खिडकीला बांधलेल्या झोका खेळत होती. मात्र, झोका खेळत असताना तिचा अचानक तोल गेला. त्यामुळे तिच्या गळ्याला फास बसला. तिच्या आजीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव आदितीच्या गळ्याला बसलेला फास सोडवला. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आदितीला मृत घोषीत केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.






















Join Our Whatsapp Group