पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, पवना ग्रुप आणि सोहम योगसाधना पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगण चिंचवड येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी सोहम योग साधनाचे श्री. दिगंबर उचगांवकर सर यांनी योग साधनेचे महत्व सूर्यनमस्कार योग घेता घेता पटवून सांगितले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधु संत यांनी योगाचे महत्व त्यांचे फायदे, त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग होय.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून अश्विनीताई चिंचवडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीश गोरडे यांनी केले असून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी उपस्थित योगसाधकांना मार्गदर्शन केले. योगाचार्य श्री दिगंबर उचगावकर यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने योग साधना घेतली. या कार्यक्रमात 300 हून अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास डॉ. नीता मोहिते, श्री. रविंद्र नामदे, सौ. उचगांवकर, रश्मी उचगांवकर, पुष्पा जाधव, जगताप सर, अतुल आडे, व इतर मान्यवर आणि सोहम योग साधना वर्गाचे साधक उपस्थित होते.