पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची कासारवाडी (आयटीआय) येथे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सन 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. या आयटीआयची स्थापना सन 2006 साली झालेली असून सहा प्रकारचे व्यवसाय इथे शिकवले जातात.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230415-WA0028-1-300x150.jpg)
मुली व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयटीआयची स्थापना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली असून सुमारे अडीच हजार विद्यार्थी या संस्थेतून शिकून बाहेर पडलेले असून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ असून स्वतःचा स्वयंरोजगार सुद्धा करत आहेत.
संस्थेमध्ये शिकवले जाणारे व्यवसाय खालील प्रमाणे..
1. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट.
2. डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर.
3. हॉस्पिटल हाउसकीपिंग.
4. कॉस्मेटोलॉजी.
5. फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी.
6. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स.
वरील प्रथम पाच ट्रेड एक वर्षाच्या कालावधीचे असून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हा दोन वर्ष कालावधीचा असलेला ट्रेड आहे. प्रवेश पात्रता दहावी पास अशी आहे. तसेच सर्व ट्रेड साठी नाममात्र फी शुल्क केवळ 2100 रुपये संपूर्ण एका वर्षाकरिता असे आकारले जाते. तरी गोरगरीब गरजू विद्यार्थी तसेच ज्यांना स्वतःच्या पायावरती हिमतीने उभे राहून पुढे जीवनात काहीतरी नवीन करायचे आहे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायचे आहे अशा महिला व मुलींना महानगरपालिकेतर्फे तसेच संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यातर्फे आवाहन आहे की त्वरित आयटीआय संस्थेशी संपर्क साधून प्रवेश घेण्यात यावा.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230621-WA0012-300x225.jpg)
पिंपरी चिंचवड महापालिकेकचेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी (मुलींची).
प्रवेश सत्र 2023-24 ऑनलाईन प्रवेश अर्ज करणेस
दिनांक 12 जुन 2023 पासुन सुरु आहे.
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11जुलै 2023 सा.05:00 पर्यंत आहे.
ITI Admission Portal:
सूचना ~~> ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्ज संस्थेत येवून योग्य कागदपत्रांसहीत कन्फरमेशन करणे व ऑप्शन देणे अत्यंत आवश्यक आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उमेदवारांच्या सोयीसाठी.
” निशुल्क”उपलब्ध करुन देण्यात येत आहे वेळ दररोज
10.00 AM TO 5:00 PM
प्रवेश अर्ज शुल्क : Online भरणे आवश्यक आहे.
राखीव प्रवर्ग Reserved Category): 100₹
अराखीव प्रवर्ग (UnReserved Category):
150₹
आयटीआय कासारवाडी मध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
# आयटीआय मध्ये भेट देऊन व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.
# आयटीआय प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने असल्याने ऑनलाइन अर्ज करावा याकरिता आयटीआय कासारवाडी मध्ये निशुल्क सेवा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा.
# दिंंनाक. 12 जुन 2023 ते दिंंनाक . 11जुलै 2023 पर्यंत.
# ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
कृपया उमेदवारांनी येताना आवश्यक कागदपत्रे :
• स्वतःचा मोबाईल फोन (ओटीपी करिता ; ईमेल आयडी) आणावा.
• आधार कार्ड
• शाळा सोडल्याचा दाखला. (LC किंवा TC)
• एसएससी मार्कशीट (दहावीची गुणपत्रिका,)
सोबत आणणे आवश्यक आहे.
याशिवाय. राखीव प्रवर्गातील उमेदवारास
1)जातीचा दाखला.
2)नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
(एससी व एसटी तसेेच ई डब्ल्यू एस कास्ट सोडून सर्वांना लागेल.)
आयटीआय प्रवेशासाठी पुढील बाबींसाठी वाढीव गुण दिले जातात –
1) इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा (ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र)
2) क्रीडा (सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र)
3) तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी (माध्यमिक शालान्त परीक्षा – एस. एस.सी. – प्रमाणपत्रावर तांत्रिक विषयाचा उल्लेख आवश्यक)
4) माजी सैनिक (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई /वडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाईल) असल्याचे प्रमाणपत्र)
5) संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई/वडील संरक्षण सेवेत असल्याचे आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र)
सोबत असावेत
[ ] दिंंनाक. 19 जुन 2023 ते दिंंनाक . 11जुलै 2023 पर्यंत. सदर दाखले झेरॉक्स प्रत व मूळ प्रत अर्ज निश्चित करताना आपण अर्जात भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची उमेदवाराने स्वतः खात्री करावी उदाहरणार्थ. नाव, जन्मतारीख , प्रवर्ग व शैक्षणिक गुणवत्ता व त्यातील गुण बरोबर असल्यानंतरच अर्ज निश्चित करावा.
[ ] दिंंनाक. 19 जुन 2023 ते दिंंनाक . 11जुलै 2023 पर्यंत. कन्फर्म म्हणजे निश्चित झाल्यानंतर अर्जातील माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येत नसल्याने अर्ज कन्फर्म करण्यासाठी पूर्वी बिनचूक असल्याची खात्री करून घ्यावी.
[ ] दिंंनाक. 19 जुन 2023 ते दिंंनाक . 11जुलै 2023 पर्यंत .अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असून त्यासाठीचे योग्य ते सर्व पुरवावे व दाखले सोबत आणावेत.
[ ] दिंंनाक. 19 जुन 2023 ते दिंंनाक . 12 जुलै 2023 पर्यंत आपल्या पसंती क्रमांका नुसार प्रथम संस्था नुसार प्राधान्य देऊन त्यातील ट्रेडस निवडावेत. म्हणजेच ट्रेड ऑप्शन टाकावेत.
[ ] दिंंनाक. 13 जुलै 2023 ते दिंंनाक . 14 जुलै 2023 पर्यंत तात्पुरती कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन स्वतः चेक तपासणी करून घ्यावी काही उणिवा असेल तर त्वरित दुरुस्ती करता हरकत दाखल करावी .
[ ] दिनांक 16 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मेरिटनुसार म्हणजेच गुणवत्ता यादीनुसार
[ ] दिनांक 20 जुलै 2023 रोजी तुम्हाला प्रथम पसंती क्रमांकाच्या व्यवसाय मिळाल्यास सदर व्यवसायास त्वरित प्रवेश घेऊन तो कायम करावा.
[ ] दिंंनाक. 21 जुलै 2023 ते दिंंनाक . 25 जुलै 2023 पर्यंत पसंती क्रमांक एक प्रमाणे व्यवसाय म्हणजे ट्रेड मिळाल्यानंतर उमेदवारांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार नाही याची नोंद घ्यावी
[ ] दिंंनाक. 21 जुलै 2023 ते दिंंनाक . 25 जुलै 2023 पर्यंत पसंती क्रमांक दोन व त्यापुढील क्रमांकाचा व्यवसाय म्हणजे ट्रेड मिळाल्यास आपण आपण प्रवेश निश्चित करू शकता किंवा पुढील फेरीसाठी वाट पाहू शकता किंवा ऑप्शन चेंज करू शकता.
[ ] सदर माहिती प्रथम फेरी पर्यंतची असून त्यापुढील माहिती करिता ऍडमिशन पोर्टलवर माहिती पुस्तिका उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा सदर माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात मोफत डाउनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
[ ] किंवा जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भेट द्यावी.