पुणे (Pclive7.com):- राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच आगमन झाले असून मागील दोन दिवसापासून शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याच दरम्यान कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळून ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

स्टॅनली डिसोझा (वय ५०) व्यक्तिचा मृत्यू झाला. तर जेरी डिसोझा साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील ८३० दस्तुर मेहेर रोड येथील दुमजली घराचे छत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले.
त्यावेळी घरामध्ये जेरी डिसोझा आणि स्टॅनली डिसोझा हे दोघेजण होते. त्या घटनेमध्ये स्टॅनली डिसोझा यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर जेरी डिसोझा हे गंभीर झाले असून त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहेत.






















Join Our Whatsapp Group