नेमकं काय घडलं?
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर वर्धा आणि यवतमाळयेथील प्रवासी होते. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी बस पेटली आणि हा अपघात झाला.
बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाच बाहेर येता आलं नाही
बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले होते. बसने पेट घेतल्याने प्रवासी होरपळले. त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे अशीही माहिती समोर आली आहे.






















Join Our Whatsapp Group