पिंपरी (Pclive7.com):- राजकारणाचा चिखल झाला आहे का?, या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का?, जर येत असेल तर ..एक सही संतापाची..! असं आवाहन देत पिंपरी चिंचवड शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराच्या वतीने ‘एक सही संतापाची’ ही मोहिम राबविण्यात आली आहे.

मनसे चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या वतीने चिंचवड गावातील चापेकर चौक येथे आज (दि.०९) रोजी सकाळी १० वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक याठिकाणी आपली सही करून संताप व्यक्त करत आहेत. तसेच उद्या (दि.१०) रोजी सकाळी १० वाजता भोसरी चौक PMT चौक येथे हा उपक्रम चालु होईल अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
दरम्यान आज चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमासाठी सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, चंद्रकांत (बाळा) दानवले, विशाल मानकरी, राजू सावळे, दत्ता देवतरासे, राजू भालेराव, निलेश नेटके, महिला शहर अध्यक्ष अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, वैशालै बोत्रे, मीनाक्षी पांचाळ, राधा साळुंखे, संगीता कोळी, वैशाली कोरटे, हेमा ननावरे, परमेश्वर चिल्लरगे, नाथा शिंदे, प्रविण माळी, सुमित कलापुरे, महेश बडगुजर, अक्षय नाळे, शरण्य पाटणे, परमेश्वर त्रिमल्ले, आकाश सागरे, मंगेश भालेकर, साइराज भोसले, मिलिंद कांबळे, लक्ष्मण गवळी, नितीन चव्हाण, भागवत नागपुरे, कैलास दुर्गे, सागर पाटील, साइराज जाधव, सुरेश सकट, विनोद भंडारी, नितीन सुर्यवंशी व सर्व मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group