पिंपरी (Pclive7.com):- मनुष्याने चंद्र, मंगळ यासारख्या ग्रहावर जीवन शोधण्यापेक्षा पृथ्वीवरील जीवन वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाचा जागर केला पाहिजे असे मत चिंचवड विधानसभेचे नेते राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.

आज वाकड येथील प्रिस्तीन प्रोलाईफ फेज 3 सोसायटी येथे राहुल कलाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी सोसायटीतील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी सोसायटीतील रहिवाशी श्री.अल्केशजी चरपे, श्री. जयवंतजी पाटील, श्री. दत्तात्रयजी देशमुख, श्री. विवेकजी सिह, श्री. अनुरागजी शिरोदे, श्री. सत्यनारायणजी हेगडे, श्री. नितीनजी सूर्यवंशी, श्री. रवीजी जाडे, श्री. संजयजी लारोरकर, श्री. संदीपजी हजारे, श्री. सुरजजी नरबरिया तसेच सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने होते.






















Join Our Whatsapp Group