पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगर येथे मेडिकल दुकानाला आग लागली. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथे एका दुकानाला आग लागल्याची वर्दी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला मिळाली.

त्यानुसार मुख्य अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता. जवानांनी एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. दुकानात लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.



















Join Our Whatsapp Group