पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने भाजपा शहर कार्यालय या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने निगडी या ठिकाणी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ज्यांच्या लेखणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा मिळाली असे थोर साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड जिल्हा शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेंद्र बाबर, विलास मडेगिरी, मनोज तोरडमल, नेताजी शिंदे, मदन गोयल, देवदत्त लांडे, कोमल शिंदे, कमलेश बहरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group