पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्रमंडळ, इंदिरानगर, चिंचवड यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन कै. सौ.मनिषा भोईर विरंगुळा केंद्र ,प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे दि. २९ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक महिला गटात पुष्करणी भट्टड, प्रथम पारितोषिक पुरुष गटात सागर वाघमारे, प्रथम पारितोषिक जेष्ठ नागरीक गटात फय्याज शेख यांना मिळाले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उप आयुक्त मीनानाथ दंडवते, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, आप्पा बागल, भारत देसला, नंदू सोनवणे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी उपस्थित होते.

स्पर्धा प्रमुख जयश्री साळवे यांनी सुत्रसंचालन केले तर अरूण खडूस यांनी आभार मानले.
























Join Our Whatsapp Group