पुणे (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा इमेल एकास पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी इमेल पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस नाईक राजेश कृष्णाजी शिर्के यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम. एम. मोखीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूगाव परिसरातील राहुल दुधाणे ‘हिंदूजम फॅक्टस’ संकेतस्थळ चालवितात. ६ ऑगस्ट रोजी दुधाणे एरंडवणे भागातील एका खासगी रुग्णालयात आले होते. त्यावेळी मोखीम याने तायडे यांना इमेल पाठविला. देशभरात बाँबस्फोट घडविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यात येणार आहे, अशी धमकी इमेलद्वारे तायडे यांना दिली होती. मी दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणार असल्याचे मोखीम याने इमेलमध्ये म्हटले होते.

दुधाणे यांनी मोखीम याने मोबाइलवरुन पाठविलेला संदेश, तसेच इमेल वाचला. त्यानंतर दुधाणे यांनी त्वरित अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.





















Join Our Whatsapp Group