पिंपरी (Pclive7.com):- हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील रहिवासीयांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. यावेळी साधारण ५००० तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी बोलताना माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी म्हणाले की, हर घर तिरंगा ह्या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे या अभियानात सहभागी होऊन आपण आपल्या मनात असलेली देशाविषयीची भक्ती, प्रेम, आदर, निष्ठा व्यक्त करू शकतो. स्वातंत्र्य लढ्यामध्ये असंख्य सैनिक, जवान, क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यामध्ये घडलेल्या विविध घटनांची आठवण तसेच देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी जनमनात राहावी.

स्वातंत्र्याच्या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण राहण्यासाठी या अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या सर्व हुतात्मांना आदरांजली अर्पण करावी. मात्र १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवणे आवश्यक असून त्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून जतन करून ठेवावे जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबाबतही काळजी घ्यावी.

यावेळी पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील लहान मुले, स्त्रिया, जेष्ठ नागरिक आणि इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group