मावळ (Pclive7.com):- आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मावळातील पवना धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण सध्या ९६.६२ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणी निचरा करणाऱ्या दरवाजावर आकर्षक अशी तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पवना धरणाला तिरंगी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पवना धरणावर करण्यात आलेल्या तिरंगा विद्युत रोषणाईमुळे धरणाच्या सौंदर्यात आकर्षक अशी भर पडली आहे.






















Join Our Whatsapp Group