पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आढावा बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रशांत शितोळे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा पवार पहिल्यांदाच शहरात आले आहेत. शहरात आज सकाळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत त्यांनी प्रशासकीय आढावा बैठक सुरू केली आहे. शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प तसेच नवीन कामांचा ते आढावा घेणार आहेत.






















Join Our Whatsapp Group