पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. एस. बी. पाटील यांनी काळाची गरज ओळखून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांचे कार्य समाजाला नवी दिशा देणारे आहे, अशी भावना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केली.
पीसीईटी च्या निगडी येथील शैक्षणिक संकुलात आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते, मावळ येथील मुख्यालयात एस. बी. पाटील यांच्या १७ व्या स्मृती दिनानिमित्त एस. बी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी. पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील, पुणे बिझनेस स्कूलचे प्राचार्य डॉ. गणेश राव, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, कुलसचिव डॉ. डी. एन. सिंग, विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. एस. बी. पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात केला जातो. त्यामुळे संस्थेचा नाव लौकिक वाढत आहे. जागतिक पातळीवर भारतातील उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थांची गणना केली जाते. त्यामुळेच विद्यार्थी, पालक पीसीईटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देतात. संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलात सुमारे बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे पद्माताई भोसले यांनी सांगितले.