पिंपरी (Pclive7.com):- स्वतंत्र भारत राष्ट्राचे पहिले उपपंतप्रधान भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यासाठी “पुरंदर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी-गुजरात” सदर ५८० किलोमीटरची सायकल राईड मोहीम आयोजित करण्यात आली होती. १७ ते १९ सप्टेंबर २०२३ असे तीन दिवस या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230913-WA0001-300x150.jpg)
पहिला दिवस पुरंदर (पुणे) ते नाशिक २४५किमी, दुसरा दिवस नाशिक ते सापुतारा पर्वत रांगेतील वघई १४५किमी आणि वघई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी-गुजरात” १९५ किमी असा एकूण ५८० किमीचा प्रवास या सायकलस्वारांनी केला. ऊन, उलटे वाहणारे वारे, सापुतारा पर्वत रांगा आणि गुजरात अखेरच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर आलेल्या पावसाचा सामना करीत प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम या तीन सायकस्वारांनी यशस्वीपणे पूर्ण केली. श्री.संतोष झेंडे, श्री.सुहास गदादे हे टाटा मोटर्स कार प्लांट पुणे येथे, श्री.शंतनू निगडे हे ॲटलास कोपको, पुणे येथे कार्यरत आहेत. या सायकल स्वारांनी मागील दोन-तीन वर्षात पुणे-पंढरपूर-पुणे, पुणे-कन्याकुमारी, पुणे-पानिपत ते अट्टारी बॉर्डर अशा लांब पल्ल्याच्या मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगभरातील सर्वात मोठा १८२ मीटर उंच असलेला पुतळा “स्टॅच्यू ऑफ युनिटी” गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या सरदार सरोवर धरणाच्या नजीक आहे. ही जगातील सर्वात उंच मूर्ति आहे. ही आपल्या भारतवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
या सायकल मोहिमेसाठी इंडो एथलेटिक सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील, श्रीकांत चौधरी, युवराज पाटील तसेच पुरंदर सायकलिस्ट क्लबचे श्री.दिलीप अण्णा झेंडे, श्री.दिपक जांभळे, श्री.मनोज मेमाणे, श्री.अजित झेंडे, श्री.केतन जगताप यांचे सहकार्य लाभले. सापुतारा पर्वत रांगा येथे सायकल टायर खराब झाला असता आयएएसचे गणेशजी भुजबळ याना संपर्क साधला असता त्यांनी त्वरित नाशिक येथे श्री. आबा पाटील यांचा मार्फत मदत मिळून दिली असे सुहासजी गदादे याचा तर्फे सांगण्यात आले. नाशिक सायकल क्लबचे श्री. आबा पाटील, श्री.सचिन पाटील, श्री.दिपक शेळके यांचे विशेष सहकार्य मिळाले.