पिंपरी (Pclive7.com):- रॅम्प वॉक करताना तुम्ही अनेक हिरोईनला पहिले असेल, फेमस मॉडेल पहिले असतील, पण कधी एखादा रांगडा पैलवान आणि आमदार असलेला पैलवान रॅम्पवर पाहिलाय का…? नसेलच.. तर पहा.. एवढंच नाही तर त्यांचा त्यांच्या सारखाच कदाचित त्यांच्या पुढे जाऊ पाहणारा त्यांचा मुलगा मल्हार याने देखील आपल्या वडीलांसोबत रॅम्प वॉक केलाय…
सध्या पुणे टाईम्सचा फँशन वीक सुरू आहे. यात मालोजी कलेक्शनसाठी आयोजकांकडून प्रशस्त आणि दमदार मॉडेलचा शोध सुरू होता. आणि योगायोग जुळून आला, पैलवान आमदार म्हणून ओळखले जाणारे महेश लांडगेंबाबत आयोजकांना समजले. त्यांनी विचारणा करताच लांडगेंनी क्षणातच होकार दिला. आणि पैलवान आमदार महेश लांडगे आपला मुलगा मल्हारसह रॅम्पवर उतरले.






















Join Our Whatsapp Group