पिंपरी (Pclive7.com):- युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख कार्यक्षेत्र भोसरी अजिंक्य रामभाऊ उबाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

अजिंक्य उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण मंदिर येथील गोकुलम गो शाळेमध्ये एक वर्षाचा चारा देण्यात आला. तसेच यमुनानगर येथील अपंग शाळेमध्ये अन्नदान करून विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. युवासेना भोसरी विधानसभा वतीने हे उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपजिल्हा प्रमुख अमित शिंदे, कौस्तुभ गोळे विभाग प्रमुख, सार्थक दोषी युवासेना विधानसभा संघटक, अनिकेत येरूनकर युवासेना विभाग प्रमुख, किरण वाडकर युवासेना उपविभाग प्रमुख यांनी जिल्हा संघटिका सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
यावेळी नितीन बोनडे शिवसेना विभागप्रमुख, अंकुश जगदाळे विधानसभा संघटक, गणेश इंगवले उपविभाग प्रमुख, आशाताई भालेकर विभाग संघटिका, नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, बाफना मंडपचे उद्योजक रविशेठ बाफना, युवाउद्योजक तानाजी शिंदे, उद्योजक राजेंद्र घोडके, सुनील समगीर युवासेना जिल्हाचिटणीस, वैभव गिरी युवासेना विभाग प्रमुख, अभिषेक सुरवसे युवासेना उपविभाग प्रमुख, सुहास तळेकर, संतोष भोसले, नरेंद्र पाटील युवासेना शाखा प्रमुख, उद्योजक प्रवीण पायाल, रणजित जगताप, मनोज कांबळे, संजय सूर्यवंशी तसेच प्रभागातील शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group