पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी दिवाळी उत्सवानिमित्त इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे विविध ठिकाणी सायकल राईड आयोजित केली जाते. यावर्षी शनिवार दि.३ आणि दि.४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी गड येथे निगडी येथून तब्बल २०० किलोमीटर अंतर पार करून बारा जणांनी यशस्वीपणे ही राईट पूर्ण केली.
यावेळी आयएएसचे अजित पाटील, गिरीराज उमरीकर, अजित गोरे, दर्शन लुंकड यांचा तर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. तब्बल २०० किलोमीटरचे अंतर पार करून सर्व सायकल पटू सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये पोहोचले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे सदस्य वर्षभर संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी सायकलवर दौरे करत असतात. यावेळी ते सामाजिक प्रबोधन व पर्यावरणाविषयी जागरूकता या विषयांवर विविध संस्थांना भेटी देत असतात त्याचाच एक भाग म्हणून नवरात्री नंतर व दिवाळीपूर्वी निघणारी ही राईड होती. असे इंडॉ ॲथलेटिक सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.
या सायकल राईट मध्ये गणेश भुजबळ, संतोष नखाते, बाळासाहेब तांबे, अमित नखाते, नंदकुमार नखाते, प्रदीप ताके, दीपक बुरकुल, श्रेयस पाटील, संदीप गायकवाड, वैभव तांबे, श्रीकांत काटे या सर्वांनी सहभाग घेतला. संपूर्ण प्रवासाचे त्याचे नियोजन रहाटणी येथील उद्योजक व गगनगिरी महाराजांचे भक्त संतोषदादा नखाते आणि संगणक अभियंता दीपक बुरुकुल यांनी यशस्वीपणे केले.