पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील मोरवाडी चौकाजवळ भरधाव कार लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. ही घटना आज (दि.०६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरवाडी चौकाजवळ घडली. सुदैवाने घटनेत जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीधर उमरने पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मोरवाडी चौकाच्या पुढे जाताच अचानक भरधाव कारच्या बोनेटमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. चालक स्वतः चा जीव वाचवण्यासाठी कार बाहेर पडले, सुदैवाने यात ते बचावले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली. तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. दरम्यान कारला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट आहे.























Join Our Whatsapp Group