पिंपरी (Pclive7.com):- आमदार श्री. पै. महेशदादा लांडगे युवा मंच व श्री. दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे साफसफाई कर्मचारी, ड्रेनेज कर्मचारी, पोलीस बांधव, विद्युत कर्मचारी यांना मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231105-WA0005-300x150.jpg)
पिंपरी चिंचवड शहरात साफसफाई मध्ये सर्वात स्वच्छ म्हणून कुदळवाडी भाग अग्रस्थानी असतो. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी प्रभागातील साफसफाई कामगार यांच्या बाबतीत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या बरोबर आमदार महेशदादा लांडगे यांनीही कायम एकमेकांना साथ देत कामगारांना सहकार्य केले आहे.
स्वी. सदस्य दिनेश यादव म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. स्वतःच्या घरातील स्वच्छतेचे काम आणि प्रभागातील काम एकच आहे असे समजून कर्मचारी काम करत असतात. आपणास अविरत सेवा देत असतात याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत.
यावेळी किसन आप्पा यादव, कुंडलिक मोरे, गणेश यादव, अमित बालघरे, प्रकाश चौधरी, शरद गोरे, रामकृष्ण लांडगे यांच्या हस्ते साफ सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त मिठाई देऊन सन्मान करण्यात आला व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रभागातील सर्व विभागांचे कर्मचारी आदी उपस्थित होते.