पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा कायम वरचष्मा राहिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवार गटातचं प्राबल्य शहरात दिसत होतं. मात्र शरद पवार गटानेही पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष केंद्रित केल असून शहराच्या मुख्य असलेल्या पिंपरी चौकात अजित पवार गटाच्या कार्यालयासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्या शुक्रवार (दि.०२) रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालय उद्घघाटनानंतर पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकारी नियुक्ती सोहळा व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याला खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, मेहबुब शेख, जयदेव गायकवाड, जावेद हबिब, प्रकाश म्हस्के, प्रशांत जगताप, आझम पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Tags: जयंत पाटीलतुषार कामठेपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटशहराध्यक्ष

























Join Our Whatsapp Group