पुणे (Pclive7.com):- पर्यटकां
राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र पुण्यातीलच नव्हे तर हे भारतातील अग्रगण्य प्राणीसंग्रहालय आहे. यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. शाळांना सुट्ट्या असल्या की या उद्यानात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्धी असते. राज्यभरातून तसेच देशातून येणारे पर्यटक मोठ्या संख्येने या उद्यानाला भेट देत असतात. नाताळ निमित्ताने अनेक शाळांना सुट्ट्या असतात, त्यामुळे लहान मुलांनी या उद्यानाला भेट द्यावी आणि त्यासोबतच पर्यटकांची गर्दी वाढावी, यासाठी महापालिकेकडून लहान मुलांना मोफत प्रवेश देण्याचे जाहिर केले आहे.
प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यकांमध्ये प्रौढ नागरिक, लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच विदेशी पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी तिकीट आकारणी करणेत येत असते. नाताळ सणानिमित्ताने २३ ते ३१ डिसेंबर दरम्यान ८ वर्षा खालील लहान मुलांना ( उंची ४ फुट ४ इंचा पर्यंत ) नि : शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. तरी लहान मुलांना राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र निःशुल्क पाहण्याकरिता पीएमली केअर ॲप व संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तरी या संधीचा फायदा सर्व लहान मुलांनी घ्यावा असे आवहान पुणे महानगरपालिकेने केले आहे.























Join Our Whatsapp Group