पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष सागर मधुकर चिंचवडे यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील फुटपाथवरील, असाह्य बेघर महिला, लहान मुले, गरजूसाठी कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री सर्वत्र फिरून मायेची उब मिळावी या उद्देशाने थंडीमध्ये त्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच शहरातील बेघर लोकांना निवारा सावली या ठिकाणी एकत्रित एका संस्थेच्या माध्यमातून सांभाळ केला जातो त्या ठिकाणी देखील ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, साहेब जसे समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम करतात तसे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, गणेश भोंडवे, प्रशांत सकपाळ, योगेश सोनवणे, विशाल जाधव, मयूर जाधव, माधवराव पाटील, सेवा दलाचे अरुण थोपटे, दिलीप पानसरे, विनय शिंदे, आशिष पांढरे, शौल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group