पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टीचे युवा शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार व प्रदेश संघटन मंत्री अजित फाटके यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी आप महाराष्ट्र युवा अध्यक्ष मयूर दौडकर, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन बेंद्रे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले की, रविराज हा जरी युवकांचे नेतृत्व करत असेल पण त्याच्यामध्ये विचारांची परिपक्वता आहे. त्याने आरटीआयच्या माध्यमातून महानगरपालिकेला कंत्राटी कामगारांना त्यांचा हक्काचा वेतन मिळवून देण्याचं अनमोल असं कार्य केलं आहे. जरी वयाने लहान असला तरी त्याच्यामध्ये विचाराची परिपक्वता आहे. मी त्याला आम आदमी पार्टीच्या प्रवेशापूर्वीही जवळून पाहत आलेलो आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाने आम आदमी पार्टीचा या शहरात विस्तृत विस्तार करण्यात त्याची मोलाची कामगिरी होणार आहे.
तसेच आप महाराष्ट्र संघटन मंत्री अजित फाटके यांनी सांगितले की, रविराज हा कुशल संघटक व रयत विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्याने सामाजिक बांधिलकी व सलोखा जपण्याचं अनमोल असं कार्य केलं. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांना न्याय देतील व युवकांची मोठी ताकद पिंपरी चिंचवड शहरांमध्ये उभी करतील अशी मला आशा आहे.
तसेच शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले की, रविराज काळे सारखा युवा आम आदी पार्टीला मिळालेला तळागाळातील, चळवळीतील निस्वार्थी व कोणाच्याही धमक्याला न घाबरणारा असा कार्यकर्ता आहे. त्यांच्यासारखेच समाजासाठी झटणारे अनेक युवा कार्यकर्ते रविराज काळे यांच्या माध्यमातून तयार होतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित राहून त्यांनी रविराज काळे ह्यांना शुभेच्छा दिल्या.
























Join Our Whatsapp Group