पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज पिंपरी ते पिंपळे सौदागरला जोडणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी केली. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, महापालिका अधिकाऱ्यांसोबत नवीन पुल बांधण्याचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

सद्या वाहतुकीला जुना पुल अपुरा पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने जुन्या पुलाला संलग्न नवा पुल बांधण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात येणारा पूल त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
परिसरात दिवसेंदिवस वाढणारी नागरी लोकवस्ती आणि परिणामी रस्तावर वाढणारी अमर्याद अशी वाहतुकीची साधने याचा मोठा ताण पूर्वी असलेल्या जुन्या पुलावर पडत होता. सदर पूल हा अरुंद स्वरूपाचा असल्यामुळे वाहतूक कोंडी होणे स्वाभाविक होते. यावर तोडगा काढण्यासाठीच याच ठिकाणी रुंद असा पूल बांधण्याचे काम माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सततच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आले.
तसेच चौक परिसर सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून पुलाजवळील दोन्ही मंदिराच्या बाजूने म्युरल्स उभे करण्यात येणार आहे. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी सुरु असलेल्या कामाचा वेग वाढवून उर्वरित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि पालिका प्रशासन यांना दिले आहेत.
























Join Our Whatsapp Group