पुणे (Pclive7.com):- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा भरदिवसा खून झाला आहे. त्याच्यावर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळचा अखेर मृत्य झाला आहे. त्याला वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.

तीन ते चार हल्लेखोरांना अगदी जवळून शरद मोहोळवर गोळीबार केला होता. गोळ्या अगदी जवळून झाल्याने मोहोळ अंत्यत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोहोळवर नेमका गोळीबार कोणी केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासुन शरद मोहोळ सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाला होता. राजकारणात येण्याची त्याची इच्छा देखील होती असे त्याचे निकटवर्तीय सांगतात.
शुक्रवारी दुपारी दीड वाजण्यच्या सुमारास मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला आहे. खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे मोहोळविरूध्द दाखल होते. काही गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका देखील झाली होती.
Tags: शरद मोहोळ
























Join Our Whatsapp Group