पिंपरी (Pclive7.com):- वारजे येथील विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव पुरस्कार यंदा अमित बच्छाव यांना जाहीर झाला.
या राज्यस्तरीय विश्वरत्न पुरस्कारामध्ये राज्यस्तरीय क्रिकेटपटू व श्री शिव छत्रपती शिवाजीराजे विद्यालयाचे संचालक अमित बच्छाव (क्रीडा व सामाजिक क्षेत्र) यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ५ वा. होणार असल्याची माहिती अध्यक्ष शिवाजी घाडगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस एफ पाटील, ज्येष्ठ कृषी व हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, डॉ दत्ता कोहीनकर, उद्योजक नंदकुमार वाळुंज, महिला गृहउद्योगचे सीइओ सुरेश कोते, शिवाजी चमकिरे उपस्थित राहणार आहे. यावेळी मोहोळ यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होईल. तसेच दुसरे अखिल भारतीय बालकवी संमेलन होणार आहे.