पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सायकल प्रेमी नागरिकांना ४४७ सायकलींचे माफक दरात वाटप
पिंपरी (Pclive7.com):- पूर्वी पुणे पिंपरी चिंचवड शहर हे सायकलचे शहर म्हणून ओळखल जात होते. त्यानंतर काळ बदलत गेला, मोटार सायकली आल्या, तसा तसा पर्यावरणाचा ही समतोल ही बिघडत गेला. आज पुन्हा आपल्याला पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य (फिटनेस) ही सांभाळता येईल अशासाठी आपण पुन्हा एकदा सायकल हा पर्याय निवडावा असे अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन केले.
आज संपुर्ण शहरातील नागरिकांना अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून अत्यंत माफक दरात सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या. या वेळी पहिल्या टप्यात ४४७ सायकलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
शहरात सायकलचे प्रमाण वाढावे यासाठी सामाजिक उपक्रमाच्या हेतूने अमित गोरखे यांनी हा पुढाकार घेऊन ही संकल्पना राबवली. यावेळी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, सायकल ही पुन्हा काळाची गरज बनत चालले आहे. सायकल ही पर्यावरण आणि शारिरीक आरोग्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठा पर्यंत सर्वांसाठी महत्वाची आहे.
या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कैलास कुटे, गणेश लंगोटे, नंदू भोगले, सूर्यकांत मोहिते, तसेच संभाजी नगर चिंचवड मधील महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघातील बबन दत्तात्रय वाडेकर, रामदास जाधव, सोपान साबळे, बाबासाहेब शिंदे, यशवंत ठाकूर, विलास पवार, महादेव भडांगे, कैलास तापकीर आदी सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.